औरंंगाबाद : माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावत सुनेचा खून केल्याप्रकरणात सातारा पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी सासू—सासर्याला अटक केली. समियोद्दीन चिरगोद्दीन सिद्दीकी (वय ५१) आयशा समियोद्दीन सिद्दकी (वय ४८, दोघे रा. अब्रार कॉलनी) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सासू-सास-यांची नावे असून त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी मंगळवारी (दि.२०) दिले आहेत.
प्रकरणात मयत कुसलूम हिचे वडील वाहिद बेग सत्तार बेग मिर्झा (वय ५४, रा. मनभा, ता. कारंजा लाड जि. वाशिम) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, कुसलूम हिचे लग्न २८ ऑक्टोबर २०१६ रोजी अनिसोद्दीन सिदीक्की याच्याशी झाले होते. माहेरहुन दोन लाख रुपये घेवुन ये म्हणत कुसलूमचा पती अनिसोद्दीन, सासरा समियोद्दीन, सासु अयशा व दीर दानिश हे वारंवार मारहाण करित होते. ३ ऑक्टोबर २०२० रोजी पीडितेने फोन करुन आरोपींनी दोन लाख रुपये आण नसता तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत असल्याचे वडीलांना सांगितले होते.
त्यावर वाहिद बेग यांनी पीडितेची समजूत काढली. ४ ऑक्टोबर रोजी अनिसोद्दीन सिद्दीक्की याने फोन करुन कुसलूमचा मृत्यु झाल्याचे सांगितले. या गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावर कुसलूमचा पती अनिसोद्दीन सिद्दीक्की, सासरा समियोद्दीन चिरगोद्दीन सिद्दीकी, सासू आयशा समियोद्दीन सिद्दकी यांच्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

