मुंबई : आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सध्या धुमशान सुरु आहे. यंदा आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहोचली असून कोरोनाच्या सावटामुळे मोजक्याच स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. आज आयपीएलमध्ये डबल हेडरची रंगत पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध सनराइझर्स हैद्राबादच्या लढतीत हैद्राबादने विजय मिळवला आहे.
तर, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट राइडर्स यांच्यामध्ये सामना सुरु आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात असून कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चेन्नईने फलंदाजी करताना सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.
चेन्नईकडून खेळणाऱ्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाड याने मागील हंगामात आपली छाप पाडली होती. गेल्या तीन सामन्यात फारशी चांगली कामगिरी न करता आल्याने या सामन्यात ऋतुराजला संधी मिळेल का ? असा सवाल निर्माण झाला होता. मात्र, या सामन्यात खेळायला मिळालेल्या संधीच सोनं केलं आहे.
सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड याने फाफ डु प्लेसीसच्या मदतीने शतकी भागीदारी रचली. चेन्नई संघाच्या धावा ११५ वर असताना चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर ऋतुराज झेलबाद झाला. मात्र, त्याने ४२ चेंडूंमध्ये ६४ धावांची खेळी केली असून त्यात ४ षटकार व ६ चौकारांचा समावेश आहे. या खेळीमुळे चेन्नईचा संघ मजबूत झाला असून फाफ डु प्लेसीसने देखील शानदार खेळी केली आहे. चेन्नईच्या संघाने २० षटकांमध्ये २२० धावा केल्या असून फाफ डु प्लेसीसने नाबाद ९५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नगरला येणारा ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, वेगळ्या भाषेचा उपयोग केल्यानंतर सोडला – थोरात
- घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीमध्ये ऑक्सिजन टँक बसवला
- संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!
- कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील
- सुनेच्या खून प्रकरणी सासू-सासऱ्याला तीन महिन्यानंतर अटक


