Share

संचारबंदीत नाथ घाट परिसरात फटफटी गँगचा धुमाकूळ!

Published On: 

पैठण : पोलीस व महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संचारबंदीच्या काळात पहाटे चार वाजेपासून गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैठण शहरातील नाथ मंदिरामागे असलेल्या नाथ घाट परिसरात फटफटी गँगने तर उच्छाद मांडलेला पाहायला मिळत आहे. पहाटे चार वाजेपासून दुचाकीधारक गोदावरी नदीच्या पात्रात सक्रिय होत असल्याचे दिसत आहेत.

या परिसरात या वाळू तस्करांनी जीव घेणे खड्डे केले असून गोदावरी नदीच्या पात्रात गोदा स्नान करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच दशक्रिया साठी येणाऱ्यांना गोदास्नान करताना आपले जीव धोक्यात घालून पाण्यात उतरावे लागत आहे सध्या पत्रात कमी पाणी असल्याने जीवित हानी होत नाही. मात्र गोदावरी नदीच्या पात्रात पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यास व पात्र पूर्ण क्षमतेने भरल्यास या ठिकाणी झालेल्या खड्ड्यांचा अंदाज बाहेरूनच आलेल्या भाविकांना, नागरिकांना येत नाही. व खड्ड्यात पडून त्यांना आपले जीव गमावले लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू भरून ही फटफटी गँग गल्लीबोळातून भरधाव वेळाने वाहन चालवतांना दिसत आहे. इतकेच नव्हे तर भरधाव वेगात भर रोड वर धावतांना दिसत आहेत. या कडे संबंधीत परिसराचे पोलीस अधिकारी, बीट जमादार हे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या बाबत पोलीस प्रशासनाचे, महसूलचे वरिष्ठ अधिकारी यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिक व्हिडिओ, फोटो पाठवतात मात्र ते दखल घेतांना दिसत नाहीत. यामुळे नागरिक व भाविकांमध्ये या अधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!