Share

सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण

Published On: 

बीड : ठेवीदारांना तब्बल २६ कोटीचा चुना लावणारा मागील तीन वर्षांपासून फरार परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचा चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे मंगळवारी येथील न्यायालयात स्वतः शरण आला. अलझेंडेला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले होते. शेवटी त्यानेच न्यायालयात शरण घेतले आहे.

येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे याने शेकडो ठेवीदारांचे २६ कोटी रुपये गिळकृत करून मागील तीन वर्षांपासून फरार होता. त्यांनी मल्टीस्टेटच्या १३ शाखा सुरू केल्या होत्या, तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर येथे ठेवी ठेवल्या होत्या. या ठिकाणी मोठा घोळ केल्याने मागील तीन वर्षांपासून चेअरमन अलझेंडे फरार होता.

परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा घोळ झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले तर अनेकांच्या मुला- मुलींचे लग्न मोडले. विजय उर्फ भारत अलझेंडे हा न्यायालयाला शरण आल्याने या ठिकाणच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. येणाऱ्या काळात त्यांना त्यांची ठेवलेली रक्कम मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!