Share

आरक्षण द्या अन्यथा रस्त्यावर उतरु: साष्टपिंपळगावातील तरुणांचा यल्गार

Published On: 

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात साष्टपिंपळगाव येथे आंदोलन सुरू आहे. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केलाय. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. यादरम्यान मंगळवारी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांनी सोमवारी लाक्षणिक उपोषण केले. ४९ दिवसापासून साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. लवकरात लवकर आरक्षण मिळाले नाहीतर रस्त्यावर उतरु असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

यावेळी वैभव औताडे, राजेश तांबडे, सुदर्शन कासुळे, आशितोष कटारे, विकास औटे या आंदोलक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या. आम्हाला आरक्षण नसल्याने गुणवत्ता नसलेले विद्यार्थी पुढे जात आहेत. मात्र गुणवत्ता धारक मराठा तरूण मागे पडत आहे. जर अशापद्धतीने दिवसाढवळ्या शैक्षणिक अन्यायाचा खून होणार असेल तर हा अन्याय सहन करणे आता शक्य नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया साष्टपिंपळगाव विद्यार्थी आंदोलकांनी व्यक्त केली.

वैभव औताडे म्हणाला, जर सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर आम्ही ही रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास सज्ज आहोत. सरकारने आमच्या भावना गांभीर्याने घ्याव्या नसता विद्यार्थी सरकारच्या विरोधात उठला तर आम्ही नक्कीच होत्याचे नव्हते केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. जोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे देखील तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!