मुंबई : झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिसऱ्या भागाचा टिझर झी मराठीने नुकताच प्रदर्शीत केला. या मालिकेसोबतच झी मराठी वर नुकतीच संपलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचाही सिक्वल येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तब्बल साडेचार वर्षे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेतील एक एक पात्र हे घराघरात पोहोचले होते. गुरुनाथ, शनाया, राधिका ही नावे प्रत्येक घराघरात पोहोचली. ‘पती पत्नी और वो’ हा धागा धरुन सुरु झालेली ही मालिका अनेक रंजक वळणे घेत रगंवली गेली. या मालिकेतील रंजक वळणे हे इतके गुंतत गेले की मालिकेची कथा कुठल्या कुठे गेली. राधिका सुभेदारची राधीका मसाले वगैरै वगैरै अनेक धागे बनवत या मालिकेने चार वर्षे या मालिकेने मनोरंजन केले.
रविवारी ७ मार्च रोजी या मालिकेला निरोप देण्यात आला. मात्र या मालिकेतील मुख्य पात्र गुरुनाथ हा काही सुधरला नाही. मालिकेच्या शेवटच्या भागात गुरुनाथ हा श्रुती मराठेच्या बॅगा उचलताना दिसला आहे. त्यामुळे श्रुती मराठेच्या एन्ट्रीने या मालिकेच्या सिक्वलची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. झी मराठी ने या आधी ‘जागो मोहन प्यारे’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकांचे सिक्वल प्रदर्शीत केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रोहितबरोबर धवन नाही तर ‘हा’ खेळाडू ओपनिंगला येणार?
- कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय
- औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू राहणार
- महेंद्र सिंग धोनी इज बॅक ; नेट्समध्ये हॅलिकॉप्टर शॉट्सची फटकेबाजी
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले धनंजय गावडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

