Share

स्मारकाच्या पैशातून रुग्णालये उभारा, त्यांना बाळासाहेबांचे नाव द्या : खा. इम्तियाज जलील

Published On: 

औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद केली आहे. मात्र त्याऐवजी प्रत्येकी १०० कोटी खर्च करून राज्यात चार रुग्णालये उभारा आणि त्याला बाळासाहेबांचे नाव द्यावे, अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी काहीच देण्यात आले नाही. स्थानिक नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे येथे होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला गेले, असा आरोपही त्यांनी केला.

‘औरंगाबाद शहरातील २०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचा १११ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तो गेल्या सात वर्षांपासून रखडलेला होता. आता ते काम लवकरच सुरू होणार आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना राज्यातील रुग्णालयांची अवस्था फारशी चांगली नाही. रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे सरकारने स्मारकावर ४०० कोटी खर्च करण्यापेक्षा यातून रुग्णालये उभारावीत आणि त्याला ठाकरेंचे नाव द्यावे, असा सकारात्मक विचार करावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वक्फ बोर्डाची जागा खरेदी करणाऱ्यांनी पैसे परत घ्यावे
जालना रोडवरील वक्फ बोर्डाच्या जागेवर अवैधरीत्या शंभर कोटींचा कॉम्पलेक्स उभारण्यात आला आहे. त्या जागेवरील मालमत्ता खरेदी करणाऱ्यांनी पैसे परत घ्यावे, त्याचप्रमाणे तेथे सुरू केलेल्या दुकानांवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन खासदार इत्मियाज जलील यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!