पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. हा निर्णय सर्व ओबीसींसाठी धक्कादायक आहे. यातच आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात 19 जुलै रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते घेत असताना आता निवडणुका लागल्याने हा मुद्दा पेटणार असल्याचे चिन्ह आहे. दरम्यान आता कॉंग्रसने देखील याच मुद्याला धरून केंद्रावर आणि मोदी सरकारवर निशाना साधला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याला राज्य सरकार नाही तर केंद्र सरकारच जबाबदार आहे. वेळप्रसंगी सगळे ओबीसी दिल्लीत जंतरमंतरवर जमून मोदी सरकारला याचा जाब विचारतील, असा इशारा काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य अध्यक्ष भानूदास माळी यांनी दिला.
‘केंद्र सरकारने ओबीसी संदर्भातील अहवालच एकाही राज्यांना दिलेला नाही. विधानसभेचे माजी अध्यक्ष यांनी विधानसभेत ठराव करून या अहवालाची मागणी केंद्र सरकारकडे केली. मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. सरकारी नोकऱ्या शिल्लक नाहीत. व खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नाही. राज्यातील ओबीसी समाज यावरून संतप्त आहे. त्यावरून काहीही होऊ शकते असा इशारा देऊन माळी म्हणाले, मराठा आरक्षणाशी याचा संबध नाही. शिवसेना राष्ट्रवादी यावर आक्रमक दिसत नाहीत, पण तो त्यांचा पक्षीय प्रश्न आहे, काँग्रेसने सुरूवातीपासून यावर आक्रमक भूमिका घेतली पाहिजे.
राजकीय आरक्षण मिळणारच आहे. पण तोपर्यंत राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना ओबीसी आरक्षण द्यावे राज्य सरकारला केंद्राने तो अहवाल त्वरीत ऊपलब्ध करून द्यावा. अन्यथा राज्यातील समस्त ओबीसी समाज दिल्लीत जाऊन मोदी सरकारला याबद्दल जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.’ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाद खुळा ! सोशल मीडियात तुफान नाराजी अन् कमानीवर कोल्हापूरची खरी ओळख झळकली !
- ‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’


