Share

‘प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा’

Published On: 

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. सिंग हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत सोबतच सिंग यांच्यावर देखील काही मंडळींनी गंभीर आरोप केल्याने त्यांचे नाव विशेष चर्चेत आहे.

सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मांडला गेला आहे.

भाजपच्या या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. ‘जो माणूस तुरुंगात आहे त्याने १०० कोटींचा आरोप केला. ज्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. NIA ने ताब्यात घेतल्यावर किंवा चौकशी सुरू केल्यानंतर त्या आरोपीने कुठल्यातरी दबावाला बळी पडून अशा स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांना हे आरोप करा, असे सांगण्यात आले आहे हे सर्व जनतेला माहीत आहे.’ असे जयंत पाटील म्हणाले आहेत

तर, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ठराव करून मागणी करायची म्हणजे आरोपीने केलेल्या मागणीला पाठिंबा द्यायचा, हे अनाकलनीय आहे. आता भाजपला कुठले कामच उरलेले नाही. भाजपने कोरोनाबाबत, विकासाबाबत चर्चा केली पाहिजे. परंतु एका गुन्हेगाराने केलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणे म्हणजे तुम्हाला या देशातील सीबीआय यंत्रणेचा गैरवापर करण्याची फारच सवय लागलेली दिसते, असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!