Share

‘काही जणांची CBI चौकशीची मागणी केल्यावर संजय राऊतांच्या छातीत कळ का आली ?’

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे चर्चेत आहेत. सिंग हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत सोबतच सिंग यांच्यावर देखील काही मंडळींनी गंभीर आरोप केल्याने त्यांचे नाव विशेष चर्चेत आहे.

सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीच नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत काल मांडला गेला.

दरम्यान, ‘महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशी नाही. जर ईडी,सीबीआयला तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस त्यांच्यासाठी फिट आहे, असं भाष्य करतानाच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. आता संजय राऊत यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय.

‘संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये. सत्तेचा गैरवापर करून एका महिलेला त्रास दिला गेला. इतकंच नाही ती महिला न्यायालयात दाद मागण्यासाठी केली तर तिला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. अशा शोषक वृत्तीच्या लोकांना प्रभू श्रीरामांच महत्व कळणार नाही आणि रामजन्मभुमीच पावित्र्य देखील कळणार नाही,’ असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलंय.

यासोबतच, ‘भाजप कार्यकारणीत काही जणांवर CBI चौकशी करा म्हणून मागणी झाली तेव्हा संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली ? वाझे जेलमधून आपल्या पापाच्या भागीदारांचे नाव घेणार तर कारवाई होणारचं ना,’ असा प्रहार देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!