Share

नाद खुळा ! सोशल मीडियात तुफान नाराजी अन् कमानीवर कोल्हापूरची खरी ओळख झळकली !

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, पैलवानांचा आणि खाद्य संस्कृतीचा वारसा लाभला आहे. तांबड्या मातीतून देशभरात कोल्हापूरचा डंका गाजवणाऱ्या मल्लांची जडणघडण या जिल्ह्यात झालेली आपण पाहिलं आहे. असं विविध अंगी खास ओळख निर्माण करणाऱ्या या शहराच्या प्रवेशद्वाराला मात्र जाहिरातबाजीला विळखा बसला होता.

कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात कोल्हापूर महापालिकेची कमान आहे. ही कमान गेले अनेकवर्षे कोल्हापूरच्या बदलांची साक्ष देत असून इतर शहरांसह परदेशात गेलेल्या कोल्हापूरकरांना आपुलकीची नाळ म्हणून या कामानीशी खास लागावं आहे. विविध शहरांमध्ये खास आकर्षण म्हणून विशेष रंगरंगोटी, नवनव्या स्टाईल, विद्युत रोषणाई यांनी येणाऱ्यांचे स्वागत केले जात असताना कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराला मात्र जाहिरातबाजीने विद्रुप केले होते.

यामुळेच, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॅट्सऍप स्टेट्स आदींच्या माध्यमातून सामान्य कोल्हापूरकरांनी रांगड्या पद्धतीने निषेध नोंदवला. कोल्हापूरची विशेष ओळख म्हणून महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, राजर्षी शाहू महाराज, रंकाळा, इत्यादी गोष्टी जगात फेमस असताना कोल्हापूर महापालिकेची पैशांसाठी कमान जाहिरातबाजीला द्यावी लागल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. जाहिरातीमुळे कोल्हापूरचा उल्लेख असलेली अक्षरे छोटी आणि जाहिरातबाजी मोठी असं दिसून येत होतं.

अखेर शिवसेनेचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन जाहिरातबाजी हटवून कमानीवर आकर्षक असा फलक लगावला आहे. यात राजर्षी शाहू महाराज यांचा फोटो असून करवीर नगरीत स्वागत करीत असल्याचं लिहिलं आहे. याचे स्टेट्स आणि फोटो लगेच व्हायरल झाले असून कोल्हापूरकर समाधान व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!