🕒 1 min read
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे.
याच प्रकरणावरून आज विधानसभेत वातावरण तापले होते. दरम्यान, सचिन वाझेंना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी आणखी काही धक्कादायक दावे केले आहेत.
ज्या गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकं आढळले होते, ती गाडी गेले चार महिने सचिन वाझेंकडेच होती. इतकच नाहीतर सचिन वाझे हे मनसुख हिरेन यांना ओळखत होते, मात्र त्यांनी ही माहिती लपवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत अधिक वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
…म्हणून सचिन वाझेंच्या राजीनाम्याची मागणी !
‘या प्रकरणात अनेक पुरावे आहेत. त्यामुळे आमची मागणी एकच होती, सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे प्रमुख आहेत. त्यांना पुरावे नष्ट करण्याचे रिसोर्सेस आहेत. त्यामुळे त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गाडी क्राईममध्ये वापरली आहे ती गाडी चार महिने त्यांच्याकडे सचिन वाझेंकडे होती हे त्यांनी लपवलं. यासोबतच, ते मनसुख हिरेनला ओळखत होते हे देखील त्यांनी लपवले, त्यामुळे 302 ची चौकशी होत राहील, मात्र आयपीसी 201 अंतर्गत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर अर्णब गोस्वामीप्रमाणे अनेकांना बेड्या पडतील, म्हणूनच भाजपचा आकांडतांडव ?’
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- वर्धापन दिनी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना ऑडिओच्या माध्यमातून संदेश
- अधिवेशन एक दिवसाने वाढवा; विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचं ठरलंय !
- औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांच्या वर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
