मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे.
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले आहेत. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना जबाब देखील दिला आहे. यावरूनच आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
या प्रकरणावरून आज सत्ताधारी व विरोधक आमने-सामने आले, अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले. यावेळी सभागृहात बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. अर्णब गोस्वामीप्रमाणे अनेकांना बेड्या पडतील, म्हणूनच भाजप वाझेंवर आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांनी 2017 साली मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले होते. आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीनुसार ठाकरे सरकारने या प्रकरणाची चाउक्शी सुरु केली आहे. सचिन वाझे यांच्याकडेच या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आलाय. ते पदावर कायम राहिले तर अर्णब गोस्वामी यांच्या प्रमाणे माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे,’ असा पलटवार भास्कर जाधव यांनी केला आहे.
सचिन वांझेची शिवसेनेची जवळीक ?
दरम्यान, फडणवीस यांनी सचिन वाझेंना अटक करावी अशी मागणी सभागृहात लावून धरली. पुरावे व तक्रार असताना महाविकास आघाडी सरकार त्यांना अभय का देतंय ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. ‘सचिन वाझेंचा एका राजकीय पक्षाशी संबंध असल्यानेच त्यांना वाचवलं जातंय,’ असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला देखील लक्ष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- रणबीर कपुर आणि संजय लीला भन्साळी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आलिया भट्ट क्वारंटाईन
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- वर्धापन दिनी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना ऑडिओच्या माध्यमातून संदेश
- अधिवेशन एक दिवसाने वाढवा; विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचं ठरलंय !
- ‘होय मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी कराच, मात्र त्यांना सोडू नका’

