Share

‘शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकास्पद’

Published On: 

उस्मानाबाद : मागील २ दिवसांअगोदर विधानसभेत बोलताना आ. कैलाश घाडगे पाटील यांनी पीक विमाच्या जाचक अटी कमी करण्यात याव्या ही मागणी केली होती. त्यामुळे आ. पाटील यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला अशी चर्चा होती. पण सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या तरतुदींचे त्यांनी स्वागत केले आहे.

फडणवीस सरकारच्या काळात राज्यात पीक विम्या वरून शिवसेनेने मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाचा हेतू राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यातील जाचक अटी कमी करण्यासाठी होत्या. आता शिवसेना स्वतः सत्तेत आहे, स्वतः शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना सुद्धा शिवसेनेचे आमदार पीक विम्यात जाचक अटी आहेत. त्या कमी करण्यात याव्यात अशी मागणी विधानसभेत करतात. त्यानंतर काल अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर मात्र कैलास पाटील यांनी अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. शेतकऱ्यांसाठी आश्वासक अर्थसंकल्प असल्याचे ते यावेळी बोलत होते.

दरम्यान शेतकऱ्यांसाठी ३ लाख रु पर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला बळकट करण्यात येणार  आहे. विकेल ते पिकेल माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा सरकारचा प्रयत्न कौतुकस्पद असल्याचे या वेळी आ.कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!