परभणी : काल मांडलेल्या अर्थसंकल्पात घोषणांच्या पाऊसाशिवाय काहीच नसून, अपेक्षेप्रमाणे अर्थमंत्री यांनी पश्चिम महाराष्ट्राला झुकता माप देत नेहमी प्रमाणे मराठवाड्यासह कोकण आणि व विदर्भास दुर्लक्षित ठेवत या तिन्ही विभागाच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या सरकारने केले आहे. त्याचबरोबर पेट्रोल व डिझेल मधील व्हॅट कमी न केल्यामुळे जनतेला याचा परिणाम सोसावा लागणार असल्याचे सांगत आ.मेघना बोर्डीकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.
काल मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस होता.मात्र मुळात मराठवाड्या सारख्या विभागावर सरकारने अन्याय केला आहे. महाविकास आघाडीचे आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पश्चिम महाराष्ट्रावर अधिक प्रेम असल्याचे आ.बोर्डीकर यांनी टीका केली. राज्यतील ४५ टक्के शेतकरी आज कर्ज माफीपासून वंचित आहेत. या सरकारला त्या शेतकऱ्यांना बद्दल काही कसा वाटत नाही असा सवाल हे त्यांनी उपस्थित केला.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता. या अर्थसंकल्पात इंधनावरील व्हॅट कमी होईल अशी अपेक्षा होती. पण असा निर्णय न घेतला मुळे येणाऱ्या काळात जनतेला महागाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान मेघना बोर्डीकर यांनी राज्य सरकारला फैलावर घेत अर्थसंकल्पातील त्रुटी दाखवून दिल्या. मराठवाड्यासाठी कुठला ही मोठा निधी न दिल्याची त्यांनी खंत व्यक्त केले. येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलमुळे महागाईचा भडका उडेल असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
महत्वाच्या बातम्या
- शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण आता कशाला?
- पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझेनेच मनसुख हिरेनला मारले, देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक
- महाविकास आघाडीचा विदर्भ, मराठवाड्यावर शैक्षणिक अन्याय; परीक्षा मंडळावर एकट्या पुण्यातुन 10 सदस्य
- ‘अमृता ताई गाण्याची आवड जोपासण्याचा प्रयत्न करता… अशीच आवड जोपासा’
- मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू, मुंबईच्या पालकमंत्र्याचे संकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

