Share

अमिताभ बच्चन यांनी केला मराठी चित्रपटाचा टीझर शेअर

Published On: 

मुंबई : दिग्दर्शक व लेखक हेमंत ढोमे यांच्या नव्या कोऱ्या ‘झिम्मा’ या मराठी चित्रपटाचा टिझर रिलीज झाला असून या टीझरचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी देखील झिम्मा चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर बघून बिग बींनाही तो शेअर करण्याचा मोह आवरला नाही.

अमिताभ बच्चन यांनी ‘सात बाई सात.बायका सात! जिवाची सफर.आता राणीच्या देशात!’ असे टि्वट केले होते. बिग-बी अमिताभ बच्चन यांनी टि्वट केल्याबद्दल सर्व कलाकारानी त्यांचे आभार व्यक्त केले. एवढच नाही तर , गायक मिका सिंगनेही ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टिझर टि्वट केला आहे. मनसे नेते अमेय खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर, हा चित्रपट येत्या २३ एप्रिल रोजी प्रदर्शीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोना काळात मनोरंजन क्षेत्राला सुद्धा ब्रेक लागला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली आहे. अशातच लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या ‘झिम्मा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटसृष्टितील ‘झिम्मा’ या चित्रपटात निर्मीती सांवत, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सुचित्रा बादेंकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, आणि क्षिती जोग सारखी दमदार कलाकार असणार आहेत. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!