Share

सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार

Published On: 

नवी दिल्ली: भारतात पेट्रोल आणि डिझेलचा भडका उडाला असताना अजून वाईट बातमी येण्याची शक्यता आहे. रविवारी सौदी अरेबियाच्या तेल उत्पादित होणाऱ्या विहिरींवर आणि ठिकाणांवर हल्ले झाले. तेल ठिकाणांवरील हल्ल्यांचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेलांच्या किमंती तीन टक्क्यांनी वाढल्या. येणाऱ्या काळात या भावात आणखी वृद्धी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आधीच भारतात शंभरी गाठलेल्या पेट्रोल डिझेल अजून भडकण्याची शक्यता आहे. क्रुड ऑईलचा एक बॅरल ७१.३७ अमेरिकन डॉलर वर जाऊन पोहोचला. तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम भारतावर देखील होणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. सौदी अरेबिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. भारत सध्या सर्वाधिक तेलाची आयात सौदी अरेबियाकडून करतो. भारत हा जगातील खनिज तेल आयात करणारा अमेरिका आणि चीननंतर सर्वात मोठा देश आहे.

भारत खनिज तेल आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. आणि सध्या देशात इंधन भाव वाढ होत आहे. त्यामुळे आधीच लोक समस्येचा सामना करीत आहेत. त्यात जर पुन्हा मोठी भाव वाढ झाली तर नागरिकांच्या समस्येत आणखीन भर पडेल. त्यामुळे सरकारने याबाबत लवकरात लवकर विचार करावा अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!