Share

जावई हर्षवर्धनच्या प्रश्नावर भडकले रावसाहेब दानवे, म्हणाले…

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत केंद्रीय मंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दानवेंना त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर दानवे चांगलेच भडकले. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला त्यांनी ‘जावयाला जाऊन भेट’ असा तिरकस सल्ला दिला.

त्याचे झाले असे की, रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे. नुकतेच दानवे यांनीच पुण्यात खोटा गुन्हा दाखल केल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. ते इतक्यावरच न थांबता दानवे यांचे राजकारण संपुष्ठात आणण्याचा दावाही जाधव यांनी केला आहे. त्यामुळे जाधव आता पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सांगत आहे. यावादाची सुरुवात घरगुती कलहा पासून झाली. दानवे यांची मुलगी आणि हर्षवर्धन यांची पत्नी यांनी सुरुवातीला पोलीस ठाण्यात तक्रार देत, जाधव यांच्याकडून मारहाण होत असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर जाधव यांच्या आईनी संजना यांच्यावर देखील पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कामानिमित्त जाधव पुण्याला गेले असता त्यांनी वृद्धाला मारहाण केली होती. त्याची तक्रार दाखल होताच त्यांना अटक करण्यात अली होती. अथक परिश्रमानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जमीन मंजूर झाला होता. तुरुंगातून बाहेर येताच सासरे दानवे यांचे राजकारण संपुष्टात आणणार असल्याचे सांगितले होते.

याच विषयावर औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देण्याऐवजी तेच पत्रकारांवर भडकले. हर्षवर्धन जाधवांच्या प्रश्नावर त्यांनी फक्त जावयाला जाऊन भेटा एवढे तीनच शब्द बोलत विषय बदलत उत्तर देणे टाळले. त्यांच्या या उत्तरामुळे मात्र दानवेंच्या मनात जावयाबद्दल नेमक्या कोणत्या भावना आहेत हे समजले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!