🕒 1 min read
औरंगाबाद : वेदांतनगरातून दुचाकीवर बहिणीच्या घरी जेवणासाठी जात असलेल्या स्वारांना कार चालकाने धडक दिली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १३ जून रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झाला होता.
संजय कचरू जाधव (वय ४९, रा. कुंभारगल्ली, बेगमपुरा) व त्यांचे मेव्हणे संजय देवकर हे दुचाकीने बहिणीच्या घरी जेवणासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने (एमएच-२०-बीसी-१७३६) धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ दवाखान्यात हलविण्यात आले.
त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर जाधव यांनी छावणी पोलीस ठाणे गाठले, याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
