🕒 1 min read
उस्मानाबाद:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. एखाद्या नवरदेवाने स्वत: लग्न करा असे म्हणण्यापेक्षा त्याच्या घरच्यांनी ती गोष्ट मनावर घेतली पाहिजे. मात्र, भाजपला लग्नाची खूप घाई झाली होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्यांचे भरणे यांनी आभार मानले आहे. विधानपरिषदेच्या चार जागांवरील यश हे कोणत्याही एका पक्षाचे नसून महाविकास आघाडीचे एकत्रित यश असल्याचे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीचा निकाल पाहता महाविकासआघाडी जिंकली असून भाजप हरल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असेही दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वस्व पणाला लावणाऱ्या भाजपचं हैद्राबादमध्येही ‘पानिपत’!
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- आता भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय – शशिकांत शिंदे
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- Kid of the Year, भारतीय वंशाची गीतांजली राव TIMEच्या सन्मानाची पहिली मानकरी

