🕒 1 min read
पुणे : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने जनता महाविकास आघाडीला कौल देणार का? याची उत्सुकता निर्माण झाली होती.
महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं असून भाजपच्या हक्काच्या नागपूर व पुण्यातील जागांवर देखील आघाडीने झेंडा फडकवला आहे. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रया देताना भजोंवर जोरदार प्रहार केला आहे. ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल…. महाविकास आघाडी महाराष्ट्राने स्वीकारली. एका वर्षात अहंकाराचे दात घशात घातल्याबद्दल महा विकास आघाडीचे जोरदार अभिनंदन’ असं ट्विट करून त्यांनी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे.
इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपा ला त्यांची खरी पात्रता कळेल….
महाविकास आघाडी महाराष्ट्राने स्वीकारली. एका वर्षात अहंकाराचे दात घशात घातल्याबद्दल महा विकास आघाडीचे जोरदार अभिनंदन— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2020
महत्वाच्या बातम्या
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
‘हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक’
- ‘शेतकरी,कष्टकरी,कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

