🕒 1 min read
नवी दिल्ली : भारतीय-अमेरिकन असलेल्या गीतांजली राव या 15 वर्षांच्या मुलीने या वर्षाचा पहिल्या ‘टाईम्स किड’चा बहुमान पटकावला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण ते औषधांचं व्यसन आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी‘टाईम्स’ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे.
कोलोरॅडो येथे राहणाऱ्या गीतांजलीची 5 हजार नामांकनातून निवड झाली. हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने तिची मुलाखत घेतली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक पातळीवर सामाजिक समस्यांवर कशी मात करता येईल याबाबत गीतांजली विचार करते. ‘टाईम’शी बोलताना तिने सांगितलं की, वयाच्या दहाव्या वर्षी तिने पहिल्यांदा आपल्या पालकांना कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नोलॉजीवर ती संशोधन करत असल्याचं सांगितलं.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गीतांजलीने ‘डिस्कव्हरी एज्यूकेशन 3 एम सायंटिस्ट चॅलेंज’ ही स्पर्धा जिंकली होती. तिच्या संशोधनासाठी फोर्ब्सच्या (Forbes)30 वर्षांच्या आतील 30 जणांच्या यादीत तिचा (30 Under 30) समावेश झाला होता.आता गीतांजलीने नवीन अॅप विकसित केलं असून, त्याचं नाव ‘काईन्डली’ असं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत हे अॅप सायबरबुलींगचा शोध घेतं. तसंच तिने ‘टेथिस’ नावाचं एक उपकरण तयार केलं असून ते कार्बन नॅनोट्यूबच्या मदतीने पाण्यातील शिशाचं प्रमाण शोधून काढते.
महत्वाच्या बातम्या
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
- ‘इथून पुढील निवडणुका बॅलेट वर झाल्यास भाजपाला त्यांची खरी पात्रता कळेल’
- महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे होतेय राष्ट्रीय पातळीवर कौतुक
- मनसेच्या रणरागिणी ऍड. रुपाली पाटील-ठोंबरे यांना ‘इतकी’ मतं!
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं


