Share

सर्वस्व पणाला लावणाऱ्या भाजपचं हैद्राबादमध्येही ‘पानिपत’!

Published On: 

🕒 1 min read

हैद्राबाद : राज्यात झालेल्या ६ विधानपरिषदेच्या जागांसोबतच आज ग्रेटर हैद्राबाद महापालिकेचे निकाल देखील जाहीर होत आहेत. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने आपल्या बड्या बड्या नेत्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ते केंद्रीय मंत्री अमित शहा अशी बलाढ्य फौजच भाजपने मैदानात उतरवली होती.

हैद्राबादमध्ये भाजपसमोर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षासोबतच तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचं आव्हान होतं. सुरुवातीला भाजपने चांगली आघाडी घेतली होती. मात्र, आता चित्र पालटलं असून दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजप तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

एकूण १५० जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समिती ७० जागांवर, एमआयएम ४५ तर भाजप ३० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, काँग्रेस केवळ ३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने या निवडणुकांमध्ये सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं होतं. प्रचारासाठी दिग्गजांची फौज देखील आणण्यात आली मात्र सद्या तेथील स्थानिक पक्षाचा बोलबाला दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील भाजपला शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणुकांमध्ये पुण्यासह नागरपूरचा बालेकिल्ला राखता आलेला नाही. त्यामुळे, बिहारच्या विजयानंतर भाजपला हार पत्करावी लागत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!