Share

आता भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय – शशिकांत शिंदे

Published On: 

मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.

मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. हे. या निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीची नव्हे तर भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे, असा टोला शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!