Share

व्हॅलेंटाईन डे रोजी आत्महत्या केलेल्या मुलाची ओळख पटली

Published On: 

औरंगाबाद : १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी शहरात शिवशंकर कॉलनीत एका २२ वर्षीय तरुणाने स्वत:ला जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. घटनेनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी या तरुणाची ओळख काढण्यात पोलिसांना यश आले होते. आकाश दिलीप इंगळे असे या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

वर्तमानपत्रातील बातमी वाचून आकाशच्या कुटूंबीयानी त्याची ओळख पटवून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. आकाश बी. एस्सी. चा विद्यार्थी आहे, त्याचे वडिल जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत मुळचा सिल्लोड येथील आकाश आपल्या आजोबांना भेटण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी मुकुंदवाडी परिसर औरंगाबाद येथे आला होता. बाहेर फिरून येतो, असे म्हणून संध्याकाळी तो घराबाहेर पडला. मात्र तो घरी परत आलाच नाही.

आत्महत्येनंतर त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु असताना त्याच्या कुटूंबाने बातमी पाहून पोलिसांशी संपर्क केला. आकाशचे अश्विनी नावाच्या एका मुलीवर प्रेम होते. ती शिवशंकर कॉलनी परिसरात राहत होती. तो बहुतेक तिला भेटायला गेला असावा अशी माहिती आकाशच्या मित्रांनी दिली. प्रेमप्रकरणातून आकाशने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!