Share

निवडणुकीच्या तोंडावर मनसेमधील गटबाजी पुन्हा समोर

Published On: 

औरंगाबाद : शहरात मनसे वाढत असताना आता नवीन जिल्हाध्यक्ष देत मनसे मध्येच गटबाजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतच ग्रामीण भागासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीप बनकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यात नाराजीचा सूर दिसत आहे. तर ग्रामीण आणि शहरातील कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी होण्याचे मनसे मध्ये बोलल्या जात आहे.

शिवसेनेत असलेले सुहास दाशरथे यांनी मनसे मध्ये प्रवेश करत, जिल्हाध्यक्ष पद आपल्याकडे खेचून आणले होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष पद मिळताच पक्षात अनेकांचे प्रवेश करत, ग्रामपंचायती मध्ये बाजी मारली होती. त्यातच आता त्यांच्या कडून जिल्ह्यातील दोन मतदार संघ काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते तसेच दाशरथे यांच्या कडून नाराजी व्यक्त होत आहे.

२०१४ च्या लोकसभेला मनसेला रामराम ठोकत, भाजप मध्ये गेलेल्या आणि मागील वर्षी परत स्वगृही आलेल्या, दिलीप बनकर यांना राज ठाकरे यांनी ग्रामीण भागाची जबाबदारी देत. वैजापूर आणि गंगापूर या दोन विधानसभा मतदार संघाचे काम सांभाळण्याची जबाबदारी, एक वर्षासाठी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मराठा समाजाचा चेहरा समोर आणत, निवडणुकीत यश संपादन करण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

सुहास दाशरथे जिल्हाध्यक्ष झाल्यावर काही स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये नाराजी होती. मुंबई येथे बैठकी दरम्यान ग्रामीण भागातील पक्ष वाढीसाठी झालेल्या चर्चेत दिलीप बनकर यांना एक वर्षासाठी जबाबदारी देत जिल्हाध्यक्ष केले आहे. त्यामुळे आता मनसे मध्ये थंडावलेली गटबाजी पुन्हा वर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!