Share

भाजपवर बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आली?

Published On: 

मुंबई – बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाअध्यक्ष केल्याची माहिती पोलिस धाडीत समोर आली असून भाजपवर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी केली आहे.

दरम्यान भाजपच्या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महेश भारत तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.एकीकडे भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोहीचा ठपका ठेवणारे भाजपाचे कार्यकर्ते आता बांग्लादेशी असल्याचे समोर येत आहेत.

बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत समोर आली आहे. याच तरुणाला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिल्याचे समोर आले आहे.

या युवकाने तयार केलेली त्याची सर्व कागदपत्रे ही बोगस असल्याचेसुध्दा समोर आली असून देशद्रोहाची भाषा करणारे भाजपाचे नेते मात्र या प्रकरणात गप्प का आहेत असा सवालही महेश भारत तपासे यांनी केला आहे.

मुंबई व महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक बांधव भाजपला मानत नसून आता त्यांना बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आलेली आहे. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भाजपच्या पदाधिऱ्यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का असा प्रश्न महेश भारत तपासे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!