Share

फॉक्सवॅगन कंपनीच्या ‘या’ दोन गाड्यांचे टर्बो एडिशन लाँच

Published On: 

मुंबई : कोरोना काळात निर्मिती थांबवल्याने अनेक कंपन्यांच्या नवीन वाहन निर्मिती आणि लाँचिंग लांबणीवर पडले होते तर अनलॉक नंतर आता या कंपन्यांकडून नवनवीन गाड्या लाँच केल्या जात आहेत यामध्ये फॉक्सवॅगन कंपनीने सोमवारी भारतात त्यांचे प्रमुख मॉडल्स पोलो आणि वेंटोचं ‘टर्बो वेरिएंट’ लाँच केलं आहे. नवीन टर्बो एडिशन पोलो या कारची किंमत 6.99 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर टर्बो वेंटोची किंमत 8.69 लाख रुपये (दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.

नव्या पोलो आणि वेंटोच्या टर्बो एडिशनसाठीचं बुकींग सुरु करण्यात आलं आहे. फॉक्सवॅगनच्या अधिकृत वेबसाईटवर आणि कंपनीच्या डीलरशिपकडे तुम्हाल आहे बुकिंग करता येणार आहे. पोलो आणि वेंटोचं नवीन टर्बो एडिशन कम्फर्टलाइन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही कार्स फॉक्सवॅगनच्या 1.0l टर्बोचार्ज्ड स्ट्रॅटिफाईड इंजेक्शन (टीएसआय) इंजिन द्वारे संचालित आहे. जे 6-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनसाठी तयार करण्यात आलं आहे. हे इंजिन 5000-5500 आरपीएम वर 81 kW मॅक्सिमम पॉवर आणि 1750-4000 आरपीएमवर 175Nm टॉर्क जनरेट करु शकतं.

फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता या दोन गाड्यांबाबतची घोषणा करताना म्हणाले की, ग्राहकांना एक्सेसिबिलिटी आणि सुरक्षित जर्मन-इंजिन असलेली वाहनं प्रदान करणे हे फोक्सवॅगनचं मुख्य उद्धीष्ट आहे. त्यानुसार आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. ग्राहकांच्या अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून आम्ही पोलो आणि वेंटोचं टर्बो एडिशन सादर केलं आहे. ही वाहनं भारतीय ग्राहकांना आकर्षित करतील.

दोन्ही कार्सच्या टर्बो एडिशनमध्ये ग्लॉसी ब्लॅक स्पॉयलर, ORVM कॅप्स, फेंडर बॅज आणि स्पोर्टी सीट कवर्ससह नवीन फीचर्स सादर करण्यात आले आहेत. पोलो आणि वेंटा ज्या रंगांसह सादर करण्यात आल्या होत्या त्या सर्वच रंगांमध्ये या दोन्ही कार्सचं टर्बो एडिशन उपलब्ध आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!