Share

भले शाब्बास! औरंगाबादने ‘या’ गोष्टीत मोदींच्या वाराणसी व अहमदाबादलाही मागे टाकले

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : स्मार्ट सिटीज मिशनच्या वतीने आयोजित राष्ट्रव्यापी सायकल फॉर चेंज चॅलेंजच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद शहराची भारतातील २५ शहरांमध्ये निवड झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) ने क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन येथे या स्पर्धेतील आव्हानाचा एक भाग म्हणून सहा किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक तयार केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मतदारसंघातून खासदार आहेत तो म्हणजे वाराणसी आणि त्यांच्याच राज्य असलेल्या गुजरातमधील अहमदाबादला मागे टाकत औरंगाबाद शहराने टॉप २५ शहरांत स्थान मिळविले आहे.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावानंतर सायकलिंगसाठी अनुकूल उपक्रम राबविण्याबरोबरच भारतातील शहरांना प्रेरणा आणि आधार देण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी भारतात सायकल फॉर चेंज चॅलेंजची घोषणा केली. शहरातील पहिल्या सायकल ट्रॅकच्या विकासासाठी क्रांती चौक ते रेल्वे स्थानक या भागाची निवड करण्यात आली. या सायकल ट्रॅकचे उद्घाटन जानेवारीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाले. मनपाने सुरू केलेले सायकल टू वर्क डे, हेरिटेज सायकल रॅली, सिडको एन -१ येथील रस्त्यावर पेंटिंग आणि ओपन स्ट्रीट्स इव्हेंटसारखे इतर उपक्रम सायकल फॉर चेंज चॅलेंजचा भाग म्हणून घेण्यात आले.

या आव्हानासाठी देशातील १०७ शहरांनी अर्ज केले होते. मंगळवारी (दि.१६) सायकल फोर चेंज चॅलेंजच्या पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाला. यात औरंगाबादने पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अहमदाबाद आणि वाराणसी यासारख्या शहरांना मागे टाकून अंतिम फेरीच्या यादीमध्ये प्रवेश केला आहे. आता निवड झालेल्या शहरांना सादरीकरण द्यावे लागेल आणि ११ शहरांमध्ये स्थान निश्चित करावे लागेल. त्यानंतर १ कोटी रुपयांची मदत सरकारकडून मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!