जोधपूर – आजीवन कारावासाची शिक्षा राजस्थानमधील जोधपूर येथील कारागृहात भोगत असलेल्या आसाराम बापू याची मंगळवारी रात्री प्रकृती अचानक बिघडली. आसाराम बापु याची तब्येत जास्तच बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्याच्यावर महात्मा गांधी रुग्णलयात उपचार सुरु आहेत.आसाराम बापूला अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीला कारागृहातील दवाखान्यात त्याच्यावर तासभर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले.
Rajasthan: Self-styled godman Asaram Bapu admitted to a hospital after he complained of restlessness, discomfort in knees and other ailments.
Asaram Bapu is serving life imprisonment in Jodhpur Central Jail in a rape case. pic.twitter.com/RIlsKNpU8z
— ANI (@ANI) February 17, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, आसाराम बापू तुरूंगात कैद असताना मंगळवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आसाराम बापूला रक्त दाबाचा त्रास असून त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत होता. तसेच त्यांच्या छातीतही वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आसाराम बापू जेलमध्ये का आहे ?
मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती.सदर मुलीने अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आसारामच्या मध्यप्रदेशात छिंदवाडा येथे असलेल्या आश्रमात प्रवेश घेतला होता. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता.
आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता. शिल्पी व शरदचंद्र यांनी आसारामला या कृष्णकृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यांनाही 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.तर आसाराम बापूला आजीवन कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राकेश टिकैत यांच्या आंदोलनाचे शेतकरी हिताशी काहीही देणे घेणे नाही’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा
- नामांकित उद्योजकाला महिलेसह दोघांची खंडणीची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

