औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदेशानुसार फर्दापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांनी दि.२३ शुक्रवारी सकाळी औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याची सीमा सील करुन जिल्हा सीमेवर पोलिस जवान तैनात केले.
शुक्रवार पासून परजिल्ह्यातील नागरिकांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र प्रशासना कडून करण्यात येणाऱ्या आव्हानाला नागरीकांनी मात्र हवा तसा प्रतिसाद दिला नाही व अनेक ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमांना तिलांजली देत आपली स्वैर वागणूक सुरूच ठेवल्याचे दिसून आले.
फर्दापूर पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंह बहूरे यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार दि.२३ शुक्रवारी सकाळी औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याची सीमा सिल करुन जिल्हा सीमेवर पोलिस जवानांना तैनात केले असून शुक्रवार पासून अत्यावश्यक सेवेत मोडणा?्या दुध,भाजीपाला,किराणा सामान,पेट्रोलियम इंधन,वैद्यकीय सेवा व मालवाहतूक करणारी वाहने वगळता औरंगाबाद जिल्हाचा रहिवासी नसलेल्या परजिल्ह्यातील कोणत्याही प्रवाश्यांना आता दि.१ मे किंवा पुढील आदेश येई पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

