Share

‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले असून विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे. दरम्यान, देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अत्यंत गांभीर्याने घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरु असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यामुळेच, पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे देखील उतरले होते.

आता, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास बंगालमध्ये मोफत लसीकरण केलं जाईल असं ट्विट भाजप बंगाल च्या अकाउंटवरून करण्यात आलं आहे. या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्युत्तर देण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका करण्यात आली आहे.

‘भाजपा का बाबा बंगाली! चुटकी बजातेही लशीकरण-वशीकरण, किया कराया? तुरंत काट! पोलिटिकल दुश्मन से छुटकारा, इलेक्शन में धोखा, गठबंधन में चोट-निसंकोच संपर्क करें, पार्टी में अनबन? किसानों कि कर्जामुक्ती, आंदोलन यात्रा में रुकावट, जटिल समस्याका थाली बजाके इलाज, गोल्ड मेडालिस्ट (वाराणसी),’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!