मुंबई : महाराष्ट्रात उत्तर प्रदेशात गंगेतून वाहून गेलेल्या ५० मृतदेहांची चर्चा झाली. पण बीडमध्ये एका व्हॅनमध्ये कोंबून भरलेल्या २२ मृतदेहांची चर्चा झाली नाही, असे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात प्रचार करण्यासंदर्भातील एक यंत्रणा उभारण्यात आलीये. त्या माध्यमातून काम होत असल्याची टीका करताना फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि बीडमधील घटनेची तुलना केली.
महाराष्ट्र सरकार रोज सकाळी एखादी खोटी किंवा दिशाभूल करणारी बातमी सोडून ती इकोसिस्टीमच्या माध्यमातून वाजवते असा आरोप फडणवीस यांनी केलाय. समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमे भाजपावर हवी तेवढी टीका करु शकतात, त्यासंदर्भात कुठलीच अडचण नाहीय. मात्र शिवसेनेच्याविरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्याविरुद्ध किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एक जरी पोस्ट टाकली तरी नोटीस देण्यात येते. आमच्या १० हजार कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नोटीस देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
काय घडले बीडमध्ये?
एप्रिल महिन्याच्या शेवटी बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. त्यावर कहर म्हणजे रुग्णवाहिकाच नसल्याने मृतदेहांना एकावर एक टाकून स्मशानभूमीत न्यावे लागत असल्याचं रुग्णालयाचं म्हणणं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
- महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?
- राज्य सरकारकडून अधिकृत नियमावली जाहीर, सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
