लखनऊ : लखीमपूर खीरीमध्ये विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्घृणपणे चिरडल्याच्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या घटनेच्या एक दिवस आधी देशाने अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली होती. लखीमपूर खीरीमध्ये दुसऱ्याच दिवशी आमच्या अन्नदात्यांना ठार मारल्याच्या घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजात अशोभनीय आहे, असं भाजप खासदार वरुण गांधी यांनी मुख्यमंत्री योगींना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे.
उत्तर प्रदेशातील पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमधून ‘भाजप’ हा शब्द काढून टाकला आहे. वरुण गांधी यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसह पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली होती. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांना ऊसाचा दर ₹ 350 क्विंटलवरुन 400 रुपये करण्याची मागणी केली होती.
आंदोलक शेतकरी बांधव आपलेच नागरिक आहेत. शेतकरी बांधव काही समस्यांमुळे त्रस्त असतील आणि त्यांच्या लोकशाही हक्कांखाली निषेध करत असतील तर आपण त्यांच्याशी मोठ्या संयमाने वागले पाहिजे.आपण आमच्या शेतकऱ्यांशी केवळ आणि केवळ गांधीवादी आणि लोकशाही मार्गाने कायद्याच्या कक्षेत संवेदनशीलतेने वागले पाहिजे. या घटनेत शहीद झालेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण करताना मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. मी तुम्हाला विनंती करतो की या घटनेशी संबंधित सर्व संशयितांची त्वरित ओळख पटवा आणि आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करा, अशी मागणीही वरुण गांधींनी केली आहे.
याशिवाय, पीडितांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची भरपाई देखील देण्यात यावी आणि भविष्यात शेतकऱ्यांवर असा अन्याय किंवा इतर अत्याचार होणार नाहीत याची खात्री करावी. मला आशा आहे की या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, तुम्ही माझ्या विनंतीवर त्वरित कारवाई कराल, अशी मागणीही वरुण गांधींनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही’


