Share

जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

Published On: 

जालना :  शनिवार (दि. 27) च्या संध्याकाळपर्यंत तरी लॉक डाऊन नाही. त्यानंतर पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. रविंद्र बिनवडे सर यांनी नुकतीच दिली आहे. कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी प्रशासन, आरोग्य विभागासह पोलिस प्रशासन देखील खुप प्रयत्न करत असल्याचे मत या वेळी राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

जालन्यासह संपुर्ण मराठवाड्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे. तर परभणी, हिंगोली, बीड येथे लॉकडाऊनची घोषणा करुन कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी पोलिस, महानगर पालिका, आरोग्य विभाग खुप युद्ध पातळीवर काम करत आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद येथे देखील रात्रीची संचारबंदी घातली आहे. परंतू आता मात्र कोरोना रुग्णांची संख्या कमी करावयाची असल्यास लॉकडाऊनचा पर्याय असणार असल्याचे मत देखील व्यक्त केले होते.

आता महाराष्ट्रामध्ये देखील कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्हामध्ये वाहनांना जिल्हाबंदीचे आदेश दिलेले आहेत. तर कोणतेही वाहन विनापरवाना तसेच अत्यावश्यक सेवा वाहन असल्याशिवाय जावू दिले जात नाही. त्यामुळे आता कोरानाचा रुग्णांचा आकडा जर आटोक्यात आला नाही, तर पुन्हा लॉकडाऊन लागू शकते अशीही परिस्थिती निर्माण होवू शकते. परंतू शनिवारी सायंकाळपर्यंत लॉकडाऊन लागणारे नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!