पुणे : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
याआधी सचिनने कोरोना टेस्ट केली होती. याचा व्हिडीओ देखील सचिनने आपल्या इंस्टग्रामवर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये तेंडुलकर डॉक्टरांसोबत मस्ती करताना दिसत होता. त्यामुळे हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. आता सचिनचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला असून सगळ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज 1.54 कोटीहून जास्त मतदार बजावणार आपला हक्क
- अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक ; आकाशाकडे पाहून म्हंटला…
- लातूर जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने; हॉटेल, बार, पान टपऱ्या, चहा कॅन्टिन बंद!
- भारताचा पराभव, इंग्लंडची वन डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही’


