Share

‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी इतर नेत्यांचे देखील फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.

दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अहवाल सादर केला आहे. आयपीएस रश्मी शुक्ला यांनी ज्या काळात फोन टॅपिंग केले त्या काळात भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नसल्याची माहिती त्यांनी या अहवालात नमूद केली आहे.  या बरोबरच वर्ष २०२० मध्ये काही अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलिस अस्थापना मंडळ-१ च्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. पोलिस आस्थापना मंडळाच्या सर्व शिफारसी सर्व सदस्यांच्या एकमताने करण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हा अहवाल लीक झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्लांसह भाजपवर होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. सीताराम कुंटेंना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखत असून मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री नवाब मलिक यांनीच तो अहवाल तयार करून केवळ कुंटेंना सही करायला लावली असेल, असा आरोप केला आहे

‘मी सीताराम कुंटे यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नसेल, असे मला वाटते. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिका यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!