🕒 1 min read
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.
दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती असं देखील या नोटमधून समोर आलं आहे.
याच मुद्द्यावरून आता खासदार नवनीत राणा यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. नवनीत राणा यांनी दिपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते तर दीपाली चव्हाण यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव वाचला असता, असे चाकणकर यांनी म्हटले.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधील माहितीचा दाखला देत नवनीत राणा यांना कोंडीत पकडले आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर राणा यांच्याकडून अजून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
सदर माहिती जेव्हा दीपाली चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत कौर राणा यांच्या कानावर घातली तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकाऱ्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो.@TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @MiLOKMAT @LoksattaLive pic.twitter.com/nGMZ7FiKFg
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 26, 2021
दरम्यान, रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जीवन संपविल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
