पुणे : पुण्यातील मेट्रो कधी सुरु होणार हा सवाल लाखो पुणेकरांना पडला आहे. आज या मेट्रोची ट्रायल रन पार पडली. बहुप्रतीक्षीत पुणे मेट्रो नुकतीचअखेर ट्रायल रनच्या निमित्ताने धावली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला.वनाझ ते आयडियल कॉलनी मार्गावर पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडली.
दरम्यान, लवकरच पुणेकरांच्या सेवेत मेट्रो येण्याची चिन्हे दिसू लागताच आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून मेट्रोचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रकाच्या माध्यमातून भाजपला देखील जगताप यांनी डिवचले आहे.
यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. पुण्यातील मेट्रोची परवानगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. केंद्र सरकारचा या प्रकल्पात सर्वात मोठा आर्थिक वाटा आहे. या प्रकल्पासाठीच्या सर्व परवानग्या आणि पायाभूत काम देवेंद्र फडणवीस सरकारने केले. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रोची चाचणी घाईघाईत उरकण्यात आल्याबद्दल त्यांनी मेट्रो कंपनीचा निषेध केला.
भाजपाच्या केंद्र आणि राज्य सरकारने सर्व काम केले असताना आता कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न इतरांनी केला तरी लोक फसणार नाहीत. यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘सरकारकडून ‘ती’ यादी राज्यपालांना पाठवली पण अद्याप मंजुरी नाही’ ; राष्ट्रवादीचा घणाघात


