बीड : महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज तोकडे आहेच. मात्र, जे पॅकेज जाहीर केले त्याची रक्कम तरी किमान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा शेतकरी सरकारच्या नावे काळी दिवाळी साजरी करतील, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. तसेचभाजपही आता मतदारसंघनिहाय मोर्चे, आंदोलन व उपोषण करणार असल्याची माहिती गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार व राज्य प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी आमदार पवार म्हणाले, जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून परतीच्या पावसाने नुकसान होत आहे. यंदा तर परतीच्या पावसाआधीच झालेल्या अतिवृष्टीने मागील ४० वर्षांत जेवढे नुकसान झाले नाही तेवढे झाले आहे. सरकार याबाबत संवेदनशील नाही. अधिकाऱ्यांनी घरात बसून पंचनामे केलेत. बाधित क्षेत्र अधिक असतानाही ते कमी दाखवले. गतवर्षीचा पीक विमा मिळालेला नाही.
यंदाही जी मदत जाहीर केली त्यालाही पंचनामे पूर्ण करण्याची अट ठेवली गेली. ही अट काढून सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळावी अन्यथा सरकारच्या नावे काळी दिवाळी साजरी केली जाईल. रस्ते, पूल, जमिनी वाहून गेल्या असून या सर्वांबाबत मतदारसंघनिहाय भाजप आंदोलन करणार असून स्वत: उपोषण करणार असल्याचेही पवार म्हणाले. यावेळी राम कुलकर्णी यांनीही सरकारवर टीका केली. एकीकडे ६१ मंडळांत अतिवृष्टीचा अहवाल शासनाचा असताना दुसरीकडे नुकसान मात्र कमी शेतकऱ्यांचे दाखवले जात असल्याची टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; एसआयटी मार्फत चौकशीची मलिकांची मागणी
- केपी गोसावीच्या सहकाऱ्याच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- कोचिंग क्लासेसनाही लवकरच परवानगी, गृहमंत्री वळसे पाटलांचे आश्वासन
- ‘गांजा फुंकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती असलेले ‘हे’…’; सदाभाऊ खोतांचा परीक्षा गोंधळावर संताप
- मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले शरद पवार, परंतु…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

