Share

Yakub Memon | दहशतवादी याकूब मेमन पुन्हा जिवंत? शिवसेना-भाजप संघर्षात भर

Published On: 

🕒 1 min read

राजकारणी लोक मुद्दा पलटवण्यात पटाईत असतात. वेगवेगळे मुद्दे काढून जनतेला भ्रमित करण्याचे काम हे सतत करत असतात. यामध्ये सामान्यांचे मुळ प्रश्न बाजूला राहतात. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष होते. राज्यातील विज प्रश्न, पाणी प्रश्न, पुरपरिस्थिती, राजकीय आशिर्वादाने झालेला शिक्षणाचा बाजार, या मुद्द्यावर प्रश्न मांडणारे आणि काम तडीस नेणारे राजकारणी आम्हाला तरी दिसत नाहीत, असो आता गडे मुर्दे उखाडण्याचे काम भाजपने केले आहे. 7 वर्षांपूर्वी फाशी दिलेला दहशतवादी याकूब मेमन राजकीय चर्चेत पुन्हा जिवंत झाला आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण आणि 7 वर्षांनंतर हा वाद का सुरू झाला?

1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी ठरल्याने याकुब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. आता याकूब मेमन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी याकुबच्या कबरीवरून राजकारण केले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकुब मेमनच्या कबरीचे समाधीत रूपांतर केल्याचा आरोप भाजप करत आहे. त्याचवेळी शिवसेनेचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारने याकुबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला होता. तेव्हाच त्याची कबर बांधण्यात आली. त्याचवेळी आता मुंबई पोलिसांनीही याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

याकूब मेमन याच्या कबरीचा फोटो व्हायरल-

याकुबला फाशी दिल्यानंतर मरीन लाइन्स रेल्वे स्थानकासमोरील 7 एकर ‘बडा स्मशानभूमी’मध्ये दफन करण्यात आले. आता याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो व्हायरल होत आहे. याकूब मेमनची कबर मार्बल आणि दिव्यांनी सजवण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. हा फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. वाद वाढल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या प्रकरणाची चौकशी करेल. याबाबत वक्फ बोर्ड, धर्मादाय आयुक्त आणि बीएमसी यांचा जबाब देखील पोलीस घेतील.

भाजप नेते राम कदम यांनी याकुबच्या कबरीचे काही फोटो शेअर केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याकूब मेमनच्या कबरीचे समाधीत रूपांतर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी मुंबईकरांची माफी मागावी, असे भाजप नेते राम कदम म्हणाले.

याकूब मेमनची कबर उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये बांधण्यात आली, असे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारांशी कशी तडजोड केली हे यातून दिसून येते. दहशतवाद्यांचा गौरव करणाऱ्या गद्दारांना का सोडले जाते याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे. एवढेच नाही तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी भाजपने केली.

शिवसेनेला हिंदुद्रोही ठरवण्याचा अजेंडा-

शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारचे धोरण आहे की दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाऊ नयेत. असे असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याकुबचा मृतदेह कुटुंबीयांकडे का सोपविण्यात आला. तसेच कबरच्या देखभालीची जबाबदारी बीएमसीची नाही तर ट्रस्टची आहे. शिवसेनेला हिंदुद्रोही ठरवण्याचा अजेंडा भाजप चालवत आहे.

या प्रकरणावर काँग्रेसने देखील त्यांची भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोधे म्हणाले की, ही भाजपची जाणीवपूर्वक केलेली चूक आहे. काँग्रेसच्या काळात अफझल गुरू आणि कसाब या दोन दहशतवाद्यांना फाशी देण्यात आली होती. दोघांनाही गुपचूप दफन करण्यात आले. ओसामा बिन लादेनच्या बाबतीतही अमेरिकेने असेच केले. पण याकुबला फाशी झाली तेव्हा भाजपची सत्ता होती. भाजपने जाणीवपूर्वक अंत्यविधीला परवानगी देऊन तमाशा घडू दिला.

स्मशानभूमीच्या कर्मचार्‍यांचा खूलासा-

स्मशानभूमीच्या कर्मचार्‍यांनी व्हायरल फोटोबद्दल एका वृत्तवाहिनीला माहिती दिली. ते म्हणाले, अशा अनेक कबरी आहेत, ज्या मार्बलने सजवल्या गेल्या आहेत. काही लोकांनी आपल्या नातेवाइकांसाठी स्मशानभूमीत जागा घेतली आहे, ज्यासाठी ते वार्षिक शुल्क भरतात, त्याचप्रमाणे याकूब मेमनची कबर ज्या ठिकाणी बांधण्यात आली आहे ती जागा फार पूर्वीपासून घेतली आहे, याकूब मेमनच्या कबरीजवळ आणखी 3 कबरी त्यांच्या नातेवाईकांच्या आहेत.

कबर सजवल्याची चर्चा पसरवणे हा कोणाचा तरी डाव आहे. कारण स्मशानभूमीत सर्वत्र लाईट आहेत. ते संध्याकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत चालू असतात. त्यानंतर ते बंद केले जातात. परंतु या काळात एखाद्याला दफन करण्याची आवश्यकता असल्यास हे लाईट लावले जातात. याकूब मेमनचे अनेक नातेवाईक येतात जे कबरीच्या स्वच्छतेची काळजी घेतात. शब-ए-बरातच्या दिवशी संपूर्ण स्मशानभूमी सजवली जाते, दिवे लावले जातात. कदाचित हा व्हायरल फोटो तेव्हाचा असावा.

महत्वाच्या बातम्या
 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!