🕒 1 min read
नवी दिल्ली : इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांंनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनांमुळे जगभर एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी बालमोरल येथे राणीचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले असून, बकिंगहॅम पॅलेसने महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची घोषणा केली आहे. एलिझाबेथ या सत्तर वर्षे ब्रिटनच्या सम्राज्ञी होत्या. त्या एकमेव होत्या की, त्यांनी ब्रिटनची सर्वात जास्त काळ सत्ता सांभाळली.
महाराणी एलिजाबेथ यांचे निधन-
महाराणीच्या निधनानंतर सर्व अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. शाही राजवाडे आणि घरांवर युनियन जॅक अर्ध्या मास्टवर फडकवला गेला आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनच्या सर्व बाह्य चौक्या आणि लष्करी तळांवरही अर्ध्यावर ध्वज फडकवण्यात आला असल्याचं समजतं आहे.
19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराणीला कोरोनाची लागण झाली होती. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. राजघराण्याने सांगितलं होतं की, राणीला ‘एपिसोडीक मोबिलीटी’ (episodic mobility) हा आजार झाला होता. यामध्ये रुग्णाला उभं रहायला व चालायला येत नाही. त्यामुळे राणी बालमोरल पॅलेसमध्ये राहत होती आणइ त्या ठिकाणाहूनच सर्व कार्यभार पाहत होती.
तसेच, राणीला चार मुले आहेत. प्रिन्स चार्ल्स, राजकुमारी ऍनी, अँड्र्यू आणि एडवर्ड, ज्यांच्यापासून त्यांना आठ नातवंडे आणि 12 पणतू आहेत. आता राणीच्या निधानानंतर प्रिन्स चार्ल्स राजा बनले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- AB de Villiers । विराट कोहलीच्या शतकानंतर एबी डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा, ट्विटरवर केला गौप्यस्फोट
- Bhaskar Jadhav । शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, भास्कर जाधवांविरोधात पोलिसांत तक्रार
- Devendra Fadnavis | याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांनी दिले आदेश
- Sudhir Mungantiwar । सुप्रिया सुळेंच्या सरकारमध्ये एवढे मुख्यमंत्री होते की मोजता येत नव्हते – सुधीर मुनगंटीवार
- Chandrashekhar Bavankule | “2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील”, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
