पुणे : राज्यामध्ये सध्या निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या खेळी रंगलेल्या पाहायला मिळतं आहेत. काहीदिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४मध्ये भाजप बारामती जिंकणार, असं वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार यांचे वक्तव्य-
बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये,असं म्हणत अजित पवार यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. आज अजित पवार पुण्यामध्ये होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात आणि लक्ष्य करतात. गेल्या 55 वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या असल्याचंही ते म्हणाले आहेत.
तसेच, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना एक हुरूप येतो. आपण काहीतरी करतो वगैरे. ते अध्यक्ष बारामतीला न जाता दुसरीकडे गेले असते, तर एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. ते बारामतीला गेल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एवढी प्रसिद्धी मिळाली असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
पुढे ते असंही म्हणाले की, बारामतीकर येत्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्याचबरोबर बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील,असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- AB de Villiers । विराट कोहलीच्या शतकानंतर एबी डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा, ट्विटरवर केला गौप्यस्फोट
- Bhaskar Jadhav । शिवसेना-भाजप संघर्ष पेटण्याची चिन्हं, भास्कर जाधवांविरोधात पोलिसांत तक्रार
- Devendra Fadnavis | याकूब मेमन कबर प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांनी दिले आदेश
- Sudhir Mungantiwar । सुप्रिया सुळेंच्या सरकारमध्ये एवढे मुख्यमंत्री होते की मोजता येत नव्हते – सुधीर मुनगंटीवार
- Chandrashekhar Bavankule | “2024पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त काही लोक शिल्लक उरतील”, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंना टोला


