Share

शहरी माओवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे देशासमोर मोठे आव्हान – अविनाश धर्माधिकारी

Published On: 

पुणे –  चीन आणि पाकिस्तान सह देशांतर्गत नक्सलवाद आणि इस्लामिक दहशतवादाचे मोठे आव्हान देशासमोर आहे. असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला’ या  भरत आमदापुरे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यावेळी केले.

सदर पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अविनाश धर्माधिकारी यांनी असे प्रतिपादन केले की,  माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जश्या प्रकारे क्रांती झाली , नक्सलवादी ते टेकनिक शंभर टक्के जशेच्या तसे भारतामध्ये प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ते आपण कोरेगाव भीमाच्या निमित्ताने पाहिले.

प्रवीण दिक्षित, महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक म्हणाले की, ‘2004 साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( माओवादी )ची स्थापना झाली. भाकप माओवादी संघटनेच्या लोकांवर झालेल्या छापेमारी मध्ये त्यांची शहरी भागात काम करण्याची रणनीती उघड झाली.’पुस्तकाचे लेखक भरत आमदापुरे म्हणाले की,  माओवाद हा संविधान आणि भारतीय लोकशाही समोरील मोठे आव्हान आहे. जे लोक शहरी भागात राहून प्रतिबंधित कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ( माओवादी ) साठी काम करतात ते म्हणजे ‘अर्बन नक्सल’ आहेत, असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा दाखला देऊन त्यांनी सांगितले की, एल्गार परिषद खटल्यांमध्ये अटकेत असलेले आरोपी केवळ सत्ताधाऱ्यांचे राजकीय विरोधक नसून प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!