पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली.
आता या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या पूर्वार्धातील लढतींनाही तो मुकणार आहे. यामुळे तो नेतृत्व करीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला देखील मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, त्याच्या या दुखापतीची चौकशी माजी खेळाडूंसह विविध स्तरातून केली जात आहे. फक्त भारतीय खेळाडूच नाही तर विदेशी खेळाडू देखील त्याची विचारपूस करत आहेत. दरम्यान, या सर्व प्रेमापोटी श्रेयस अय्यरने एक ट्विट करत जोरदार पुनरागमन करत असल्याचे सांगत स्वतःसह चाहत्यांना देखील धीर दिला आहे.
I’ve been reading your messages and have been overwhelmed by all the outpouring of love and support. Thank you from the bottom of my heart to everyone. You know what they say, the greater the setback, the stronger the comeback. I shall be back soon ❤️???? pic.twitter.com/RjZTBAnTMX
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) March 25, 2021
‘मी आपले संदेश वाचत आहे आणि सर्वांच्या प्रेमामुळे आणि समर्थनामुळे मी भारावून गेलो आहे. मनापासून सर्वांचे धन्यवाद ! कोणीतरी म्हणून गेलंय, जितका मोठा धक्का बसेल तितकंच जोरदार पुनरागमन होईल…मी लवकरच परत येईन !’ असं ट्विट श्रेयस अय्यरने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तेव्हा तपास योग्य झाला असता तर आज पर्यावरण मंत्री वेगळा असता’
- शहरातील रस्ते कामांची गुणवत्ता तपासण्याचे केंद्रीय अवर सचिवांचे आदेश
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- रश्मी शुक्लांचा माझ्याशी थेट संपर्क नाही, मात्र भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती – यड्रावकर
- तिकीट तपासणीसाची नोकरी लावून देतो म्हणत तिघांची १६ लाखांची फसवणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

