जालना : मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. आज (दि.२५) साष्टपिंपळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका मांडावी तसेच इतर मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
मराठा समाजातील तरुण आणी तरुणींकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे ते सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ५० दिवसाहून अधिक कालावधी पासून साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थ उपोषण आणि ठिय्या आंदोलन करत आहे.
याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मध्यस्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील, मुक्ताबाई ढेपे, भारती कटारे, गीता तांबडे, वैष्णवी जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत आपल्या मागण्या त्यांचा समोर मांडल्या.
साष्टपिंपळगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर निकाली काढण्याची विनंती सदर बैठकीत करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ३० % मुसलमानांची एकजूट झाली तर भारतामध्ये चार नवे पाकिस्तान बनू शकतात; तृणमूलचा नेता बरळला
- अतिरिक्त उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
- मोठी बातमी : सचिन वाझेंचा एनआयए कोठडीतील मुक्काम वाढला !
- कोविड सेंटरवरील जागा संपल्या, मनपाने घेतले ३१ मंगलकार्य ताब्यात
- जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य नाही, कोणताही आमदार एवढा कमकुवत नसतो – दरेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
