Share

कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष करणार; निलेश राणेंची सिंहगर्जना  

Published On: 

सावंतवाडी – भाजपचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने आपल्याला हे पद मिळाले असून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. पक्षाला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. एवढेच नव्हे तर कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष केल्याशिवाय गप्प राहणार नाही, असा ठाम विश्वास नवनिर्वाचित भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला.

सावंतवाडी शहरातील कार्यकर्त्यांकडून झालेल्या भव्य स्वागतानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांप्रती ऋण व्यक्त केले. आम्ही जे काही आहोत ते या आमच्या सहकाऱ्यांमुळेच आहोत. हे त्यांचे प्रेम आणि त्यांच्या ऋणातच राहणे यातच आम्हाला समाधान आहे असे त्यांनी म्हटले.

पक्षाने माझ्यावर पदाची जबाबदारी दिल्यानंतर हा माझा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे केलेलं हे जल्लोषी स्वागत व दाखविलेल प्रेम अभूतपूर्व असून मी नेहमीच त्यांच्या ऋणात राहीन, अशी भावनिक प्रतिक्रियाही दिली यावेळी दिली.

सावंतवाडी शहरातील जल्लोषी स्वागतानंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहीनी मडगांवकर, सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, परिमल नाईक, आनंद नेवगी महिला नगरसेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!