Share

सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित २५% करवाढ रद्द केली आहे. यामुळे सलग चार वर्षापासून रखडलेली मालमत्ता करवाढ यावर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीनंतर फेब्रुवारी महिन्यात मालमत्ता करात वाढ करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येत असतो.

पालिकेची निवडणूक न झाल्यामुळे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आधिपत्याखाली प्रशासकीय कारभार सुरू आहे. कोरोना संसर्गामुळे २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू होते. या काळात अनेक व्यवसायिक, व्यापारी, हातावर पोट असणारे तसेच समाजातील सर्वच घटकांना याचा आर्थिक फटका बसला. यामुळे येत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करात प्रस्तावित २५% करवाढ न करण्याचा निर्णय आयुक्त पाण्डेय यांनी फेटाळला.

मागील तीन वर्षापासून ही मालमत्ता करवाढ सुचवली जात आहे. मागील वर्षी हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी तो रद्द केला होता. आधी शंभर टक्के वसुली करा, त्यांनतर कराच्या दरात वाढ करा असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे होते. तर मागील त्याआधी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने दरवाढ नाकारली होती. या निर्णयामुळे आर्थिक मालमत्ता धारकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!