Share

बुलढाण्याला आगामी अर्थसंकल्पात जास्तीत जास्त निधी देण्याची अशोक चव्हाण यांची तयारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आशियाई विकास बँकेच्या निधीअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन रस्त्यांचा समावेश प्राधान्याने करण्याबाबत विचार करण्यात येईल. तसेच या मतदारसंघातील प्रस्तावित २८ कोटी रक्कमेची रस्ते व पुलांची कामे केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत घेण्याबाबत प्रस्ताव सादर करावे. हे प्रस्ताव प्राधान्याने विचारात घेऊ, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच येत्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त रस्त्यांच्या कामांना निधी देण्याची बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मागणीलाही चव्हाण यांनी सहमती दर्शविली.

सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पूल व शासकीय इमारतींच्या विविध प्रस्तावासंदर्भात डॉ. शिंगणे यांच्या विनंतीनुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. डॉ. शिंगणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड यांच्यासह अमरावती विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्ते, पुल व इमारतींचा समावेश केंद्रीय मार्ग निधी, नाबार्ड, विशेष दुरुस्ती कार्यक्रम या विविध योजनेमध्ये करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाण्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यावेळी केली. यामध्ये आशियाई विकास बँक अंतर्गत ५ कोटी ४३ लाख रकमेची चार रस्त्यांची सुधारणा, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २८ कोटी ७० लाख किमतीची सुमारे १४ कामे तसेच नाबार्ड अंतर्गत १३ कोटी ३८ लाख रक्कमेच्या १० कामांचा समावेश आहे. तसेच आगामी अर्थसंकल्पात राज्यमार्गाची चार कामे, प्रमुख जिल्हा मार्गाचे १२ कामे प्रस्तावित करण्यात आली असल्याचे शिंगणे यांनी यावेळी सांगितले.

चव्हाण म्हणाले की, आशियाई विकास बँक निधीअंतर्गत प्रस्तावित अमडापूर-लव्हाणा-दुसरबीड-राहेर- वर्दळी ते जालना जिल्हा सिमा रस्ता आणि शेंदुर्जन-राजेगाव-सुलतानपूर-वेणी-गुंधा-हिरडव-वढव ते वाशिम जिल्हा हद्द या दोन्ही रस्त्यांचा समावेश करण्यासंदर्भात प्राधान्याने विचार केला जाईल. तसेच केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत या मतदारसंघातील जास्तीतजास्त कामे घेण्यात येईल. सिंदखेड राजा येथील पर्यटन विभागाकडे असलेले विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर त्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात येईल. तसेच देऊळगाव मही येथील विश्रामगृहाच्या नुतनीकरणाचाही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश चव्हाण यांनी यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!