Share

ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Published On: 

चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काही प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. कसोटी सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याबाबत ही घडना घडली होती. सामन्यातील चौथ्या दिवशी जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाने याची अधिकृत तक्रार केली होती.

त्यानंतर रविवारी पुन्हा असा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी मोहम्मद सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. सिराजला ब्राउन डॉग आणि बिग मंकी असे शब्द वापरले गेले. हे दोन्ही शब्द वर्णद्वेषी मानले जातात. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी बुमराहला देखील असेच शब्द वापरले. या संतापजनक प्रकरणाबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वातून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच बातमी समोर येत काही की इंग्लंडमध्ये वर्णभेद कमी करण्यासंदर्भात खेळाडूंना योग्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

वर्णभेद संदर्भात इंग्लंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बातम्या समोर येत असतात. त्यामुळे वर्णभेद कमी करण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एका सर्वेनुसार निदर्शनास आले की इंग्लंडमध्ये कृष्वर्णीय व आशियाई खेळाडूंसंदर्भात दूषित पूर्वग्रह बाळगला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रशिक्षणामध्ये ड्रेसिंग रूममध्ये वागण्याची पद्धत तसेच विविध संस्कृतींच्या व्यक्तींबद्दलचा सादर शिकवला जाईल. त्याचसोबत एखादी चुकीची घटना घडत असेल तर त्याला विरोध करणे देखील गरजेचे असेल. मागील काही दिवसांत 600 खेळाडूंचा सर्वे करण्यात आला होता व त्यातील तब्बल 45 टक्के खेळाडूंनी सांगितले की त्यांच्यावर वर्णभेद केला गेला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!